पर्यावरण प्रश्नमंजुषा... सत्र 6 : उन्हाळी 2024
महाराष्ट्र राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर रु. साठ हजाराची शिष्यवृत्ती व शैक्षणिक टॅब प्रदान करण्याची योजना.
"ईकोफ्रेंडली ग्रुप" जयसिंगपूर यांनी सन 2018-19 या वर्षापासून सुरू केली आहे. कॉलेज शिष्यवृत्ती परीक्षा अनुक्रमे पदवी/पदवीधर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात असते. ही शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाइन प्रकारात घेतली जाते.
सदर परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असेल
(जो भविष्यातील पर्यावरण क्षेत्रातील स्पर्धापरीक्षा व त्यांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊनच नियोजित केला आहे)
विद्यार्थ्यांच्या माहितीचा अभ्यासक्रम
सामाईक विषय : पर्यावरण, अवकाश व संरक्षण (वेबसाइट पहा)
विषय : पर्यावरण (वेबसाइट पहा)
याकरिता एक समिति स्थापन केली असून, त्यामध्ये विषयनिहाय तज्ञ शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या वेळोवेळी बैठका व कार्यशाळा संपन्न होऊन त्यात अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे व तो मान्यतेसाठी विद्यार्थ्यांना सादर करण्यात आला आहे.
सदर परीक्षेचा अभ्यासक्रम पदवी/पदवीधर वर्गांसाठी नेमून दिलेला/प्रकाशित केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आधारित पहिली परीक्षा फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतली गेली होती व आता प्रत्येक वर्षाच्या मे व डिसेंबर महिन्यात वर्षातून दोनदा घेतली जाते (वर्षात दोन उपसत्र उन्हाळी व हिवाळी).
तसेच "शिका शिकवा व कमवा" या योजनेअंतर्गत आपण आर्थिकदृष्ट्या अप्रगत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत. याबरोबरच प्रगतशील प्रज्ञावान विद्यार्थ्यांकडेसुद्धा विशेष लक्ष्य दिले जाणार आहे. प्रश्नमंजुषा परीक्षा ही अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी असावी ज्याअर्थाने त्यांचा अभ्यासक्रम त्याअनुकूल असावा, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व एक कमविण्याचे साधन मिळावे असे आग्रही मत इंजि. कुंदन चव्हाण (संचालक "ईकोफ्रेंडली ग्रुप" जयसिंगपूर) यांनी मांडले आहे.
परीक्षेसाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना उपयुक्त ठरेल अशा मार्गदर्शिकेची निर्मिती करून वेबसाइटवर (पिडीएफ स्वरूपात) प्रकाशित व प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गठित समितीच्या वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. परिषदेतील अधिकारी वर्ग व लेखन समितीच्या परिश्रमातून अतिशय कमी कालावधीत या मार्गदर्शिकेची निर्मिती केली जात आहे.
या प्रश्नमंजुशेसाठी एकच पेपर असून पेपर पर्यावरण विषय समावेश आहे. पेपरसाठी स्वतंत्र मार्गदर्शिकेची रचना केली आहे. परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी असणार आहे. प्रत्येक मार्गदर्शिकेत घटक व उपघटकनिहाय महत्वाचे मुद्दे दिले आहेत. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा हा यामागचा उद्देश आहे. पाठांतर पद्धतीला फाटा देऊन विद्यार्थ्याने प्रत्येक उपघटक समजून घेऊन अभ्यासावा अशी मार्गदर्शिकेची रचना आहे.
प्रत्येक उपघटकावर 30% सोपे प्रश्न, 40% प्रश्न मध्यम व बाकी 30% प्रश्न कठीण स्वरूपाचे असणार आहेत. मार्गदर्शिकेत प्रत्येक उपघटकाची मांडणी शक्यतो सोप्या भाषेत, पुरेशा उदाहरणांसह करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आलेला आहे. सरावासाठी दिलेल्या प्रश्नांच्या बरोबर उत्तरांची सूची मार्गदर्शिकेच्या शेवटी देण्यात आली आहे.
ही मार्गदर्शिका (वेबसाइट) जास्तीत जास्त निर्दोष व्हावी या दृष्टीने समितीतील निवडक सदस्य तसेच विषय तज्ञ, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकडून समीक्षण करून घेण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांची व लेखन समितीची "ईकोफ्रेंडली ग्रुप" खूप आभारी आहे. तसेच इतर तज्ञांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
विद्यार्थी, शिक्षक व पालक या प्रश्नमंजुशेचे स्वागत करतील याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9156656934 (सांगली - कोल्हापूर विभाग)
संकेतस्थळ (वेबसाइट): क्यूआर कोड स्कॅन करा किंवा 9156656934 या क्रमांकावर "ईक्यूसी 2024" व्हाट्सअप्प मेसेज करा.
ऑफिसच्या पत्त्यासाठी गूगलवर शोधा : ईकोफ्रेंडली ग्रुप, जयसिंगपूर. (शैक्षणिक)
जाहिरात स्थळ : जयसिंगपूर. संचालक
दिनांक: 15/12/2023 इंजि. कुंदन चव्हाण बी. टेक (केमिकल)
वर्ष (365 दिवस) पूर्ण झाल्यावर फी परत. ईकोफ्रेंडली शिका शिकवा आणि कमवा योजना. *नियम व अटी लागू
© सर्व हक्क ईकोफ्रेंडली ग्रुप जयसिंगपूर राखून असेल. 2018-2024
Echofriendly Environment Quiz Competition 2024
ईकोफ्रें डली ग्रुप, जयसिंगपूर व हायटेक लॅब, सांगली यांचा सन 2018 पासनू चा वैज्ञानिक व शालेय उपक्रम
कोण बनणार ए. पी. जे. अब्दुल कलाम ...? सत्र ४ ऊन्हाळी मे २०२२
एक अशी प्रश्नमंजुषा जी घडवेल आपली कारकिर्द ...
शैक्षणिक पार्टनर : टार्गेट आयआयटी आणि मेडिकल अकॅडमी, जयसिंगपूर.
प्रत्येक वर्षी जिल्हा पातळीवरील दोन विजेत्यांना मिळणार रू.एक लाखाची शिष्यवृत्ती व शैक्षणिक टॅब जिंकण्याची संधी*
इतर बक्षिसे : रेंजर सायकल, वह्या, स्कूल बॅग व शालेय साहित्य*
एमपीएससी/जेईई/नीट सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त... आजच नाव नोंदणी करा...
माध्यमिक गट:- गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) उच्च माध्यमिक गट:- गट क (११ वी आिण १२ वी सायन्स)
विषय : पर्यावरण (Environment) – विज्ञान (Science) – गणित (Maths) – अवकाश (Space) – संरक्षण (Defence) – बुद्धिमत्ता (IQ)
परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन तसेच ऑफलाइन परीक्षा, दोन पेपर (पेपर 1 व पेपर 2), 100 मार्क, एक किंवा अनेक उत्तरे बरोबर (एमसीक्यू)
निवड चाचणी : 1 मे 2022 रोजी, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल.
(परीक्षा माहिती, रोल नंबर, अॅडमिट कार्ड व ऑफलाइन परीक्षा ठिकाण एप्रिल महिन्यात कळवले जाईल).
प्रवेश फी: 31 जानेवारी 2022 सायंकाळी 5 पर्यंत रु. 75 फक्त : : विलंब शुल्काविणा 15 फेब्रुवारी 2022, सायं. 5 पर्यंत रु. 125/- प्रती स्पर्धक,
विलंब शुल्कासहित 15 मार्च 2022, सायं. 5 पर्यंत, रु. 175/- प्रती स्पर्धक,
अतीविलंब शुल्कासहित 15 एप्रिल 2022, सायं. 5 पर्यंत, रु. 250/- प्रती स्पर्धक,
नाव नोंदणीची (वाढवलेली मुदत) शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022, सायं. 5 पर्यंत.